घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईत जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील महाकाय होर्डिंग्ज कोसळलं. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुंबई येथे होर्डींग कोसळून झालेला अपघात अतिशय दुर्दैवी आहे. या अपघातानंतर होर्डींगच्या स्ट्रक्चरल ऑडीटचा विषय चर्चेत आलेला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात उभा असणाऱ्या प्रत्येक होर्डींगचे ‘स्ट्रक्चरल ऑडीट’ करण्याची गरज आहे.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, याखेरीज संपूर्ण मतदारसंघात उभा करण्यात आलेली होर्डींग्ज योग्य ती परवानगी घेऊन उभारलेली आहेत का हे देखील तपासण्याची गरज असून अनधिकृत, बेकायदा होर्डींग्ज तातडीने काढून टाकण्याची कारवाई प्रशासनाने करावी. हा विषय अतिशय महत्वाचा असून जिल्हाधिकारी पुणे व पुणे महापालिका आयुक्त यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com