Supriya Sule : हे सरकार लोकांचा विचार करणारे सरकार नाही, लोकांना प्राधान्य देऊन शासन करणारं सरकार या देशात असायला हवं

Supriya Sule : हे सरकार लोकांचा विचार करणारे सरकार नाही, लोकांना प्राधान्य देऊन शासन करणारं सरकार या देशात असायला हवं

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव उतरले असताना भारतात मात्र पेट्रोल-डिझेलच्या दरात कसलीही कपात करण्यात आलेली नाही. सर्वसामान्य माणूस महागाईच्या जात्यात भरडत चालला आहे.

यासोबतच त्या म्हणाल्या की, तेल कंपन्यांना याचे कसलेही सोयरसुतक नसून तेलावर लादलेल्या अधिभाराचा मलिदा ओरपण्यात त्यांना स्वारस्य आहे. तर राज्य लाभांश घेण्यात मग्न आहे. हे सरकार लोकांचा विचार करणारे सरकार नाही. लोकांना प्राधान्य देऊन शासन करणारं सरकार या देशात असायला हवं. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com