लाडकी बहीण योजनेवरुन सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना धरलं धारेवर
सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना आणली. तुमच्या भवितव्यासाठी योजना नाही तर त्यांच्या स्वार्थासाठी. कोण मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणतो, कोण लाडकी बहीण म्हणतो मला नेमकं नाव माहिती नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे.
लाडकी बहीण योजनेवर टीका करत म्हणाल्या की, सगळे प्रश्न पैशाने सुटत नाही. ते घाबरले आहेत, दिवाळीच्या आधी अणखी 5 हजार देतील. दिवाळीच्याआधी पैसे काढून घ्या यांचा काही भरोसा नाही. बहिणींनी प्रेमाने मागितले असते तर सगळं देऊन टाकले असते. त्यांना बहिणीचं नातं कळलं नाही. आम्ही 1500ला नाते विकणारे नाही. लाडकी बहीण जाहिरातीसाठी 200 कोटी खर्च केले.
पुढेत्या म्हणाल्या की, जिल्हा बँकेतील फक्त एका व्यक्तीवर कारवाई केली, इतर १२ लोकांवर कारवाई नाही. कारण ते सत्तेत, १२ लोकांवर कारवाई केली नाही. सगळ्यांना सारखा न्याय आम्ही दे. गरिबांचे पैसे डुबवली असेल तर कोर्टात जाऊन सुप्रिया सुळे न्याय मिळवून देईल असं देखील त्या म्हणाल्या.
आता लढाई वैचारिक आणि नैतिकतेची. लढाई संपलेली नाही, पक्ष साहेबांच्या हातून घेतला. मी अजूनही मी कोर्टाची पायरी चढते, मी अदृश्य शक्तीला घाबरत नाही. सगळ्या संस्थांची सत्ता त्यांच्याकडे होती पण आमच्याकडे जनतेची ताकद होती.
देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाल्या की, देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होत्या, विरोधात असले तरी चांगले असू शकतात. त्यांच्यात चांगले गुण होते, मुख्यमंत्री राहिले आहेत. पण 2 पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झाले म्हणाले, माझा मुलगा म्हणेल 2 पेपरला कॉपी करून पास झालो. कॉपी करून पास होऊ नका. रस्त्यावर उतारा माऱ्यामाऱ्या करा असे फडणवीस सांगत आहे.
नाशिक पोलिसांचे अभिनंदन करा, दंगल झाली तरी जाणार माझ्या मुलीला मी सांगितले. नाशिक पोलिसांनी थांबविले, जे सत्तेत आहेत त्यांनी दंगल भडकवली. नाशिक एका दिवसांत शांत झालं. सत्तेतील लोकांनी लाडकी बहीण, दंगल आणि सोलून काढायची भाषा सुरू नाशिक दत्तक घेतले होते किती वेळा आले? तुम्हीच म्हणतात कुणी दंगल केली, असं त्या म्हणाल्या.