Supriya Sule On Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या 'त्या' गौप्यस्फोटावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

छगन भुजबळांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया: पवारांवरील आरोप गंभीर
Published by :
Team Lokshahi

थोडक्यात

  • छगन भुजबळांनी आंतरवली सराटी प्रकरणावरून मोठा गौप्यस्फोट केला.

  • पोलिसांवर झालेली दगडफेक ही पूर्वनियोजित असल्याचा दावा केला.

  • यानंतर राजकरणात चांगलीच खळबळ उडाली.

Supriya Sule On Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने गाजलेल्या आंतरवली सराटी प्रकरणावरून ज्येष्ठ ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पोलिसांवर झालेली दगडफेक ही पूर्वनियोजित असल्याचा दावा करताना त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. यामुळे आता राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाले की, माझी विनम्रपणे भुजबळांना विनंती आहे की, तुम्ही आदणीय पवार यांच्यावर केलेला आरोप मोठा आहे. साहेबांच्या पक्षात मी काम करते, माझी हात जोडून भुजबळ साहेबांना विनंती आहे की, बैठक कुठे झाली, केव्हा झाली, सांगावं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com