Bigg Boss Marathi | दादा बोलतात ते करतात; Suraj Chavanने झापूक झुपुक स्टाईलमध्ये केलं दादांचं कौतुक

बिगबॉस मराठी विजेता सूरज चव्हाणने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांचे कौतुक केले. झापूक झुपुक चित्रपटाबद्दल माहिती दिली.
Published by :
shweta walge

मराठी बिगबॉस विजेता सूरज चव्हाणने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल भेट घेतली. अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतली असल्याची माहिती सूरजने दिली. तसच झापूक झुपुक चित्रपट लवकरचं प्रसिद्ध होणार असल्याच त्याने सांगितलं.

यावेळी तो म्हणाला की, "अजितदादा बोलतात ते काम करतातच, देवमाणूस आहेत दादा..." पुढे बोलताना सूरज म्हणाला की, अजितदादांना माझ्याकडून खूपखूप शुभेच्छा... मी त्यांना भेटण्यासाठी आलो. मलाच भेटायचं होतं दादांना. कधी एकदा दादांची भेट घेतोय असं झालं होतं. माझ्या घराचं काम सध्या सुरू आहे. अजितदादा बोलतात ते काम करतातच, देवमाणूस आहेत दादा..."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com