"डान्सबारवर बंदी असतानाही अनेक ठिकाणी...", सुरेखा पुणेकर यांचा खळबळजनक आरोप
राज्यभरात डान्सबारवर बंदी आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी अवैधरित्या डान्सबार चालवले जातात. आता राज्यातील अनेक संस्कृतिक कला केंद्रामध्ये डान्स बार आणि डीजे सुरु असल्याचा दावा लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केला आहे. राज्यातील 82 पैकी 42 कला केंद्रांमध्ये डान्स बार, डीजे सुरु आहे. त्या ठिकाणी काय, काय प्रकार सुरु असल्याचे सुरेखा पुणेकर यांनी सांगितले आहे.
डान्सबारबद्दल सुरेखा पुणेकर म्हणाल्या की, "डान्सबारमुळे अनेक संगीतकार, कलाकार यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. दरम्यान त्यांनी याबद्दलचे व्हिडिओ देखील शेअर केले. या व्हिडिओमध्ये डान्सबारमध्ये तरुणी नाचताना दिसत आहेत. तसेच त्या महिलेसोबत तरुण अश्लील चाळे करतानादेखील दिसत आहेत. सुरेखा पुणेकरांनी शेअर केलेले हे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
सुरेखा पुणेकर यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, लावणीच्या माध्यमातून सुरेखा पुणेकर या प्रकाशझोतात आल्या. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी तमाशामध्ये काम करण्यास सुरुवात केली. गेली अनेक वर्ष त्यांनी या क्षेत्रात काम केले. सध्या त्या राजकारणात सक्रिय असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये आहेत.