ताज्या बातम्या
सुरेश धस यांची अजित पवारांवर टीका; अमोल मिटकरी म्हणाले...
आमदार सुरेश धस यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली होती.
आमदार सुरेश धस यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली होती. 'क्या हुआ तेरा वादा ... असे म्हणत सुरेश धस यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.
यावरुन आता राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, श्री @Dev_Fadnavis जी आपल्या पक्षाचे आमदार श्री सुरेश धस यांनी काल परभणी मधील मुक मोर्चात क्या हुआ तेरा वादा अजितदादा अशा प्रकारे वक्तव्य करुन आदरणीय अजितदादाविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार? असे अमोल मिटकरी म्हणाले.