Suresh Dhas : अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ही भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले की, वाल्मिक कराड हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. मी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, वाल्मिक कराड यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गॅग्ज तयार करण्याचे काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे आणि या गॅग्ज सर्वच्या सर्व मोक्काच्या अंतर्गत राखेची गँग, वाळूची गँग यांचे वेगवेगळे धंदे आहेत. त्याच्या वसुलीच्या गँग.
या जेवढ्या गँग आहेत त्या सर्वच्या सर्व गँग मोक्कामध्ये जर नाही घातल्या तर भविष्यामध्ये हे जे तिकडे तिहार जेलमध्ये जे होते मी कुणाचे नाव घेऊन इच्छित नाही. वाल्मिक कराड हा चोरांचा, दरोडेखोरांचा साथीदार आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मी मागणी केली नाही. मी आतापर्यंत आका आणि आकाचे आका म्हणत होतो. आकाबद्दल आता मी स्पष्ट बोलायला लागलो आहे. आका या सगळ्यात आहे. आकाला माहित नव्हते का जिल्ह्यामध्ये काय चाललं आहे? असे सुरेश धस म्हणाले.