संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोन आरोपींना पुण्यातून अटक; सुरेश धस म्हणाले...
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून अटक झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या आरोपींना पळून जाण्यास ज्याने मदत केली होती, त्याला आधी पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावर आता सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश धस म्हणाले की, मुख्य आरोपी तो नाहीच आहे. ते प्यादे आहेत. मुख्य आरोपी ते आका आहेत. दोन आरोपी आज एलसीबीने पकडले. असं मला कळालं. एलसीबीचे अभिनंदन. पण जे राहिलेले आहेत.