Suresh Dhas: 'मुन्नी' ट्विस्टवर सुरेश धसांनी दिली हिंट, राष्ट्रवादीच्या मुन्नीचं कोडं सुटलं?
बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबरला हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. जातीयवादातून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात होता. यादरम्यान राजकीयवर्तुळात खळबळ माजली होती. बीड प्रकरणाचा मोर्क्या वाल्मिक कराड याला अटक करावी यासाठी अनेक मोर्चे काढले जात होते. तो वाल्मिक कराड अखेर आज पुणे पोलिसांना शरण आला आहे. याचपार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी बीड प्रकरणी अनेक मोर्चे देखील केले.
मुन्नीचा उल्लेख
याचपार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे राजीनामा देत नसल्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 'क्या हुआ तेरा वादा' असे म्हणतं लक्ष्य केले. आता त्यांनी बडी मुन्नीचा उल्लेख केला आहे. मात्र ही मुन्नी कोण असा प्रश्न सर्वत्र पडला होता याबद्दल आता सुरेश धस यांनी इशारा दिला आहे.
मुन्नीने बाहेर येऊ द्या.. - सुरेश धस
दरम्यान सुरेश धस म्हणाले होते की, सुरेश धस म्हणाले की, राष्ट्रवादीतील मुन्नी ही पुरुष आहे, ती कोणी महिला भगिनी नाही, आणि मी ज्या मुन्नीला बोललो आहे तिला हे 100% कळालेलं आहे. फक्त ती अजून बाहेर आलेली नाही... मुन्नीने बाहेर येऊ द्या, मुन्नी अगोदरचं बदनाम झालेली आहे. असं म्हणत पुढे धस म्हणाले की, "मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए" असं म्हणत धस यांनी या मुन्नीवर घणाघाती टिका केली आहे.
अखेर मुन्नीचं कोडं सुटलं?
पुढे धस म्हणाले की, ही मुन्नी या डार्लिंगसाठी मुन्नी पूर्णपणे बदनाम झालेली आहे. मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे माझ्याकडे आहेत, असं सुरेश धस म्हणाले. राष्ट्रवादीतील बडी मुन्नी आणि बदनाम मुन्नीने समोर येऊन बोलावे मग मी बघतो, असे म्हणत पुढे धस यांनी सूचित केले.