Suresh Dhas vs Ajit Pawar: मुन्नी कोण? दादांनाही माहित नाही; सुरेश धस यांचा रोख कुणाकडे?

सुरेश धस यांनी राष्ट्रवादीतील 'मुन्नी' वर घणाघाती टीका केली आहे. अजित पवारांनी या प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घ्या, 'मुन्नी' कोण आहे आणि या वादाचे नेमके कारण काय आहे.
Published by :
Prachi Nate

बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबरला हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. यादरम्यान राजकीयवर्तुळात खळबळ माजली होती. याचपार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी आता बडी मुन्नीचा उल्लेख केला आहे. मात्र ही मुन्नी कोण असा प्रश्न सर्वत्र पडला होता याबद्दल आता सुरेश धस यांनी इशारा दिला आहे.

दरम्यान सुरेश धस म्हणाले होते की, सुरेश धस म्हणाले की, राष्ट्रवादीतील मुन्नी ही पुरुष आहे, ती कोणी महिला भगिनी नाही, आणि मी ज्या मुन्नीला बोललो आहे तिला हे 100% कळालेलं आहे. फक्त ती अजून बाहेर आलेली नाही... मुन्नीने बाहेर येऊ द्या, मुन्नी अगोदरचं बदनाम झालेली आहे. असं म्हणत धस यांनी या मुन्नीवर घणाघाती टिका केली आहे.

याचपार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान अजित पवार म्हणाले की, बडी मुन्नी कोण आहे हे त्यांना विचारा... अशा फालतू गोष्टी जर कोणी बोलत असेल, मी स्पष्ट नाव घेऊन बोलणारा आहे... त्यामुळे या सर्व प्रकाराबद्दल त्यांना विचारा कोण आहे ते... अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com