ताज्या बातम्या
Suresh Dhus : वाल्मीक कराड हा जेल प्रशासनाचा जावई आहे का? सुरेश धस यांचा संतप्त सवाल
वाल्मीक कराड जेल प्रशासनाचा जावई आहे का? असा संतप्त सवाल भाजप आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केला.
वाल्मीक कराड जेल प्रशासनाचा जावई आहे का? असा संतप्त सवाल भाजप आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे. जेलमधील मारहाणीनंतर बीडच्या जेलमधून महादेव गीते ला हलवलं, अक्षय आठवले ला हलवलं.
मारहाणीच्या घटनेनंतर जेल प्रशासनाने ही कार्यवाही केली मग वाल्मीक कराड हा काय जेल प्रशासनाचा जावई आहे का? असा सवाल आमदार सुरेश धस यांनी विचारला. तसंच बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि जेलच्या प्रश्नावर मी अजित पवारांसोबत बोललो असं देखील सुरेश धस यांनी म्हटलं आहे.