Suresh Dhas : गोपीनाथ गड हे गोरगरिबांसाठी लढणारं विद्यापीठ - सुरेश धस
आमदार सुरेश धस नुकतेच परळीमध्ये जाऊन आले. यादरम्यान त्यांनी संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला भेट दिली होती. त्याचसोबत ते गोपीनाथ गडावर नतमस्तक झाले होते. यादरम्यान त्यांनी सांगितल की, ते परळीत आल्यानंतर कधीही गोपीनाथ गडाचे दर्शन घेतल्या शिवाय जात नाही.
याचपार्श्वभूमिवर आमदार सुरेश धस म्हणाले की, "3 जून रोजी देखील मी गोपीनाथ गडावर येत असतो. 12 डिसेंबर रोजी मी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या घरी सांतून पर भेटीला गेलो होतो त्यामुळे मी गोपीनाथ गडावर येऊ शकलो नाही. परळीत आल्यानंतर मी कधीही गोपीनाथ गडाचे दर्शन घेतल्या शिवाय जात नाही. मी जवळपास दहा वर्ष गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर काम केलं काही वेळेस त्यांच्या विरोधात देखील काम केलं. गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात कधीही चुकीचे वक्तव्य केलं नाही".
"आताही कुठे वाकायचं कुठे झुकायचं कुणाबरोबर राहायचं हे मुंडे साहेबांकडूनच शिकलेलो आहे. संघर्ष कोणाबरोबर करायचा हे आम्हाला गोपीनाथ रावांनी शिकवलं. आता अन्याय अत्याचाराच्या विरोधात व गोरगरिबांसाठी लढणारा कोणता विद्यापीठ असेल, तर तो गोपीनाथ गड आहे. गोपीनाथराव हे गोपीनाथराव होते, त्यांच मन फार मोठं होत. गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर त्यांचा वारसा पाहायला मिळत नाही", असं आमदार सुरेश धस म्हणाले आहेत.