Mumbai Local Train Updates : मध्य रेल्वेच्या विस्तारासाठी नव्या मार्गांचे सर्वेक्षण
मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाने परळ आणि कल्याण दरम्यानच्या 46 किमी लांबीच्या कॉरिडॉरसाठी 17 जुलै 2024 पासून सर्वेक्षण सुरू केले होते. हा उपक्रम आता 2025 च्या ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कसाठी एक मोठी विस्तार योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योजनेत, मध्य रेल्वेने परळ आणि कल्याण दरम्यान प्रस्तुत केलेले 7 व्या आणि 8 व्या रेल्वे मार्गांसाठी फील्ड सर्वेक्षण सुरू केले आहे.
कल्याणच्या पलीकडे असणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार करण्याचे काम पहिलाचं सुरु झाले आहे. .सध्या, सीआर कुर्ला आणि सीएसएमटी दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. हा मार्ग 34 किमीचा असून त्याचा पहिला भाग 10.1 किमीचा कुर्ला-परेल विभाग आहे, जिथे आउटस्टेशन टर्मिनस असेल. तर दुसरा मार्ग परेल ते सीएसएमटी पर्यंत विस्तारलेला असेल, अशा दोन भागात हा मार्ग विभागलेला आहे. त्याचसोबत घाट विभागातही क्षमता वाढवण्यासाठी अतिरिक्त मार्ग टाकले जात आहेत.
या नवीन मार्ग दीर्घकालीन नियोजनाचा भाग आहेत. यामुळे बाहेरील रेल्वे सेवा वाढतील. ज्यामुळे चारही राष्ट्रीय मार्ग उपनगरीय वाहतुकीत अडथळा न आणता स्वतंत्रपणे धावतील. हा यामागचा उद्देश आहे. तर भविष्यासाठी तयार होत असलेले परळ मेगा टर्मिनस तयार करण्यासाठी आणि राष्ट्रीय रेल्वे वाहतूक, उपनगरीय ऑपरेशन्सपासून वेगळी करण्यासाठी हे मार्ग मोठ्या योजनेचा भाग ठरणार आहेत.