Mumbai Indians Latest News Update
Mumbai Indians Latest News Update

मुंबई इंडियन्ससाठी खूशखबर! षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या 'या' दिग्गज फलंदाजाचं होणार पुनरागमन

आयपीएलमध्ये पाचवेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या आयपीएल हंगामात पुरती दमछाक उडाली आहे, पण...
Published by :

आयपीएलमध्ये पाचवेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या आयपीएल हंगामात पुरती दमछाक उडाली आहे. सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे. स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामने खेळू नाही. शस्त्रक्रीया झाल्यानंतर तो रिकव्हरीमध्ये व्यग्र होता. अशातच हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईच्या संघासाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. सूर्यकुमार यादवला एनसीएकडून फिट घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरोधात होणाऱ्या सामन्यात मुंबईन्ससाठी सूर्यकुमार मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेत टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमार यादवच्या पायाला (घोटा) दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला दोन शस्त्रक्रीया कराव्या लागल्या. पायाची शस्त्रक्रीया केल्यानंतर त्याने स्पोर्ट्स हार्नियाची शस्त्रक्रीयाही केली. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीने सूर्यकुमार यादवला फिट घोषित केलं आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सूर्यकुमार यादव फिट असल्याची पुष्टी करत माहिती दिली की, सूर्यकुमार यादव आता फिट आहे. एनसीएने त्याला काही सराव सामने खेळण्यासाठी सांगितलं आणि तो आता फिट दिसत आहे. सूर्यकुमार मुंबई इंडियन्स संघात सामील होऊ शकतो. सूर्यकुमार सामने खेळण्यासाठी शंभर टक्के फिट आहे का, याची आम्हाला खात्री करायची होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com