सुषमा अंधारे यांचे निलम गोऱ्हेंवर घणाघाती आरोप, म्हणाल्या, "बेईमानी करुन..."
शिंदे गटाच्या निलम गोऱ्हे सध्या खुप चर्चेत आल्या आहेत. "मर्सिडिज दिल्या की पदं मिळतात" , आशा आशयाचे वक्तव्य त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली. अनेक राजकीय नेत्यांनी गोऱ्हे यांच्या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीकादेखील केली. संजय राऊत, अखिल चित्रे, किशोरी पेडणेकर यांच्यानंतर आता सुषमा अंधारे यांनीदेखील निलम गोऱ्हे यांच्यावर जहरी टीका केली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, "निलम गोऱ्हे या नेहमीच शिवसेनेमध्ये लोकांना बाजूला कसं ठेवता येईल याबद्दल नेहमी विचार करायच्या. त्या अनेक शिवसैनिकांशी खुप हिडीसपीडिस वागायच्या. त्या कोणालाही सहज पक्षात प्रवेश करु द्यायच्या नाहीत. त्यांनी माझा पक्षप्रवेशदेखील लगेच होऊ दिला नाही. त्या कधीही पक्षवाढीसाठी प्रयत्न करत नाहीत.पक्षात कोणाला प्रवेश द्यायचा,कोणाला नेमणूक द्यायची, पदं द्यायची, हे सगळं काम नीलम गोऱ्हे बघायच्या.
पुढे अंधारे म्हणाल्या की, "मर्सिडिज दिल्या की पद मिळतं असं वक्तव्य गोऱ्हे यांनी केले. पण हडपसर या भागात निलम गोऱ्हे यांना पहिली आमदारकी कशी मिळाली? त्यासाठी दोन मर्सिडिज गाड्या कुठून आणल्या. गोऱ्हे यांचा नक्की असा कोणता व्यवसाय आहे ज्यामुळे त्यांची संपत्ती 200 ते 250 कोटी रुपयांची मालमत्ता आहे? तसेच संमेलनामध्ये साहित्यिकांना बोलावलं जाता. ज्यांचा संबंध साहित्याशी असतो आशा व्यक्तींना आमंत्रित केले जाते. पण निलम गोऱ्हे कोणत्या निकषाने साहित्य संमेलनामध्ये उपस्थित होत्या? निलम गोऱ्हेसुद्धा एकही संधी सोडत नाहीत.
नंतर अंधारे म्हणाल्या की, "प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे निलम गोऱ्हे यांना ओळख मिळाली. पण गोऱ्हेंच्या शब्दकोशात इमानदारी आणि प्रामाणिकपणा हे शब्द नाहीत. प्रकाश आंबेडकरांशी त्यांनी बेईमानी केली. नंतर त्यांनी शरद पवार यांच्याशीही बेईमानी करुन त्या आमच्याकडे आल्या. नीलम गोऱ्हेंना एखादी राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचं असेल तर त्यांनी ते खुशाल पाडून घ्यावं.पण बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून पक्षाने समाजातील लहानसहान लोकांना संधी देण्याच्या परंपरेवर घाव घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिमा मलीन केली आहे".