सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा;  जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टी
Admin

सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा; जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टी

ठाकरे गटातील कोणता ना कोणता नेता शिंदे गटात प्रवेश करत आहे.

ठाकरे गटातील कोणता ना कोणता नेता शिंदे गटात प्रवेश करत आहे. यामुळे ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता बीडमधून बातमी येत आहे. ठाकरे गटाचे बीडमधील जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडिओमुळे ठाकरे गटातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, सुषमाताई अंधारे आमच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या पैसे मागत आहेत. आपल्या कार्यलयात एसी, फर्निचर आणि सोफा बसवण्यासाठी त्या पदाधिकाऱ्याकडून पैसे घेत आहेत. माझ्या लेकरा-बाळाच्या मुखातील पैसे खर्च करून मी पक्ष वाढवत आहे. याकडे सुषमा अंधारेंचं लक्ष नाही. त्यामुळे सुषमा अंधारेंचा आणि माझा वाद झाला. या वादात मी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या. सुषमाताई अंधारे सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करत आहेत. त्या माझंही पद विकत आहेत. मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे. रक्ताचं पाणी करत आहे. असे ते म्हणाले. मात्र असे काही नसल्याचे सुषमा अंधारेंनी स्पष्ट केलं आहे.

याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांनी मोठी कारवाई केली आहे. जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा;  जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टी
“मी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या”; असे म्हणत ठाकरे गटाच्या नेत्यानं व्हिडिओ केला शेअर
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com