सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; अंधारेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; अंधारेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली आहे.

सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधी हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती मिळत आहे. महाडमध्ये हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. हेलिकॉप्टरचा पायलट सुखरुप असून हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अस्पष्ट आहे.

याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, प्रचार सभा होती. ही प्रचार सभा झाली. त्यानंतर आम्ही उशिरापर्यंत आमचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. मी सकाळी माझे सहकारी घेऊन हेलिपॅडला आले होते. पावने नऊचं ते लँडिंग होते आणि 9 वाजताचं टेकऑफ होते. परंतु नऊ दहा पर्यंत कुठलीही हालचाल नाही असं लक्षात आल्यानंतर कॉर्डिनेटरला फोन केला. त्यांनी सांगितले की, दहा पंधरा मिनिटामध्ये ते लँडिंग होत आहे. नऊ वीसला आम्हाला ती हालचाल जाणवली. तीन चार चकऱ्या वर मारल्या गेल्या आणि अचानक ते गोल फिरत खाली आलं.

धुराचा लोट आणि मोठा आवाज झाला. नंतर माझ्या ड्रायव्हर यांनी मला सांगितले की, हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. मला कॅप्टनची काळजी वाटत होती. कॅप्टन सुखरुप आहेत की नाही? पण आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद कॅप्टन सुखरुप होते. यासोबतच त्या म्हणाल्या की, पोलीस त्यांचे काम करतील. काय ते सत्य बाहेर येईल. परंतु आता तरी मला असं वाटतं की, सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा ज्या पाठिशी आहेत त्या सगळ्यांचे आभार मानले पाहिजे. आम्ही सुखरुप आहोत. आम्ही महाड पालिकेकडून सर्व परवानग्या घेतल्या होत्या. असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com