एक तर भाजपात या नाहीतर जेलमध्ये जा ही भाजपाची भूमिका; आदित्य ठाकरेंच्या विधानावर सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण
Admin

एक तर भाजपात या नाहीतर जेलमध्ये जा ही भाजपाची भूमिका; आदित्य ठाकरेंच्या विधानावर सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण

हैदराबाद येथील गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

हैदराबाद येथील गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे आता राजकीय वातावरणात चर्चा रंगल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केले. एकनाथ शिंदे यांनी बंड का केले? यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केलं आहे. भाजपसोबत गेलो नाहीतर मी तुरुंगात असेन, असे त्यांनी म्हटले. एकनाथ शिंदे त्यावेळी मातोश्रीवर येऊन रडले होते. केंद्रीय यंत्रणांकडून अटक होणार होती, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री आमच्या घरी येऊन रडले होते. जर भाजपसोबत गेलो नाही तर ते मला अटक करतील. असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारेंनी स्पष्टीकरण दिले आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपाची ती मोडस ऑपरेंडीच आहे की आमच्यासोबत आलात तर आम्ही तुम्हाला वॉशिंग मशीनमधून धुवून काढू आणि दोषमुक्त करू. लोकांच्या ईडी आणि सीबीआयच्या फाईल होत्या. त्या उघडल्या जाण्याची भीती होतीच. पण तुम्ही आमच्यासोबत आला नाहीत, तर मात्र तुम्ही जेलमध्ये जाल. असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com