"झुकेगा नही घुसेगा साला" हा डायलॉग भारीच होता पण 2016 पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि... - सुषमा अंधारे
फेसबुक पोस्ट टाकल्याने ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या महिलेला शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. ते प्रकरण सध्या प्रचंड गाजत आहे. त्याच प्रकरणावरून उध्दव शिवसेना ठाकरे गटप्रमुख उध्दव ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती.
पत्रकार परिषदेत बोलताना उध्दव ठाकरेंनी फडणवीसांवर विखारी टीका केली. ते म्हणाले होते की, एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. केवळ उपमुख्यमंत्रीपद मिरवलं आणि चमकायचं हेच ते करत आहेत. फडतूस गृहमंत्र्याला पदावर बसण्याचा अधिकार नाही. स्वतःच्या घरात काही झालं की एसआयटी नेमायची. हे गुंड मुख्यमंत्री आहेत का? गुंड मंत्री असं एक खातं आता त्यांनी या सरकारमध्ये सुरु केलं पाहिजे. ताबडतोब गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी टीका उध्दव ठाकरेंनी केली होती.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याला प्रतिउत्तर दिले की, मी फडतूस नाही काडतूस आहे. मी गृहमंत्री आहे, याचीच अनेकांना अडचण आहे. पण मी गृहमंत्रीपद सोडणार नाही. बेकायदेशीर काम करणाऱ्यांना तुरुंगात टाकणारच असे ते म्हणाले.
यावर आता ठाकरे गटाचे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "झुकेगा नही घुसेगा साला" हा डायलॉग भारीच होता पण 2016 पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नी वर स्पायिंग करत होती हे तुम्हाला 7वर्षे कळले नाही आणि तुम्ही #घुसायच्या बाता कराव्यात हे काय पटत नाही राव !! असे त्यांनी ट्विट करत फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.