'माझा भाचा आणि भाऊ किती लाचार' सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री शिंदे आणि श्रीकांत शिंदेवर निशाणा

'माझा भाचा आणि भाऊ किती लाचार' सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री शिंदे आणि श्रीकांत शिंदेवर निशाणा

कल्याणमध्ये एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्या आईसमोर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी आदित्य कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे.
Published by :
shweta walge
Published on

कल्याणमध्ये एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्या आईसमोर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी आदित्य कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी कल्याणचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला आहे.

त्या म्हणाल्या की, माझा भाचा आणि भाऊ किती लाचार झाले आहेत, अशी खोचक टीका केली. गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेनेत संघर्ष पाहायला मिळत आहे. यावरुनच अंधारेंनी शिंदे पिता पुत्रांना लक्ष्य केले.

'माझा भाचा आणि भाऊ किती लाचार' सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री शिंदे आणि श्रीकांत शिंदेवर निशाणा
नितीन गडकरी यांचा काटा काढण्याचा प्लान, विजय वडेट्टीवार यांचा मोठा गौप्यस्फोट

दरम्यान, कल्याण पूर्वेकडील तिसगाव परिसरात राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीची बुधवारी संध्याकाळी आपल्या आईसोबत घरी येत होती. तेवढ्यात सोसायटीच्या आवारातच आदित्य कांबळे या माथेफिरू तरुणाने तिच्यावर चाकूने सात-आठ वार करत तिच्या आईसमोर तिची हत्या केली. हत्येनंतर त्याने त्याच्याजवळची फिनाइलची पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. या गोंधळात आरोपीने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. पण, तो पूर्ण फिनेल घेणार त्यापूर्वी नागरिकांनी त्याला थांबवलं आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com