काका-पुतण्यांची गुप्त भेट; सुषमा अंधारे म्हणाल्या 'लपवून ठेवण्याची गरज...'

काका-पुतण्यांची गुप्त भेट; सुषमा अंधारे म्हणाल्या 'लपवून ठेवण्याची गरज...'

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाली आहे.
Published by :
shweta walge

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पुण्यात पहील्यांदाच दोघात ही गुप्त बैठक पार पडली. या भेटीमुळे अनेक चर्चाना उधाण आलं आहे. यावरच लोकशाहीशी बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, त्यांच्या या भेटीने संभ्रमाचं वातावरण तयार होतं. पण त्याच वेळेला संसदेत ज्या पध्दतीने खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर थेट हल्ला चढवत जे भाष्य केलं तेही फार महत्वाचं होतं, त्याला दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यांची आजची भेट गोंधळाची स्थिती निर्माण करणारी आहे. पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा देशात आणि राज्यात वेगळा ठसा आहे. कुठलीही कृती करताना त्यांना कोणालाही घाबरण्याची किंवा लपवून ठेवण्याची गरज नाही. पवारांना असं जरी वाटलं की दादा आणि पवारसाहेब एकत्र येणार आहेत, तर त्यावरही ते उघडपणे भाष्य करण्याइतके सक्षम आहेत. ते तसे सक्षमपणे सांगू शकतात. लपून छपून भेटी-गाठी करायच्या आहेत, अंधारात ठेवायचं आहे, असं मला नाही वाटत. जोपर्यंत ते स्पष्टपणे भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत आघाडीतील एक जबाबदार आणि महत्त्वाचा घटकपक्ष म्हणून याबाबतीत आम्ही घाईघाईने निष्कर्ष काढणे आणि बोलणे योग्य ठरणार नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

काका-पुतण्यांची गुप्त भेट; सुषमा अंधारे म्हणाल्या 'लपवून ठेवण्याची गरज...'
शरद पवार, अजित पवारांच्या भेटीवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com