शरद पवार, अजित पवारांच्या भेटीवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

शरद पवार, अजित पवारांच्या भेटीवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाली आहे.
Published by :
shweta walge
Published on

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पुण्यात पहील्यांदाच दोघात ही गुप्त बैठक पार पडली. यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमृता फडणवीस नेमकं काय म्हणाल्या?

शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात गुप्त भेट झाली याबद्दल काय वाटतं? असा प्रश्न एका मांध्यमाच्या प्रतिनिधींनी विचारल्यानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या की, "एवढी तर मला आयडिया नाही कोण गुपचूप भेटतं. पण भेटणं कधीही चांगलं, गुपचूप भेटा किंवा सर्वांपुढे भेटा, प्रेमानं भेटा ही सगळ्यात चांगली गोष्ट आणि भेटत राहा"

शरद पवार, अजित पवारांच्या भेटीवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
शरद पवार-अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा

दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर अमृता फडणवीसांनी पवारांवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. अजित पवार विरोधीपक्षात होते तेव्हा यापूर्वी अमृता फडणवीसांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर टीकाही केल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com