Waqf Bill : सुप्रीम कोर्टाची स्थगिती म्हणजे, 'आम्ही काहीही करू शकतो, भाजपच्या या Attitude ला धक्का'; सुषमा अंधारेंचा टोला

नव्या वक्फ कायद्यातील दोन कलमांना आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडून तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे.
Published by :
Rashmi Mane

नव्या वक्फ कायद्यातील दोन कलमांना आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडून तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारला उत्तर देण्यास सात दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. केंद्र सरकारने जैसे थेच परिस्थिती ठेवावी, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे. या स्थगितीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे

"संविधान दुर्बल घटकासाठी आहे. याचाच आधार घेत आज व बोर्डाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. कलम 25 आणि कलम 26 याचा विशेष उल्लेख करण्यात आला प्रत्येक व्यक्तीला आपलं धार्मिक स्वातंत्र्य आबाजी करण्याचा संस्थानी त्याच व्यवस्थापन स्वतंत्रपणे चालवण्याचा अधिकार असेल. संसद बहुमताच्या आधारे एखादा कायदा घटनात्मक चौकटीत तपासण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला प्राप्त होतो. सुप्रीम कोर्ट अशा कायद्यांना रोखण्याचे काम करू शकतात, आज सुप्रीम कोर्टाने ते रोखण्याचे काम केलं. एका अर्थाने भाजपचा जो अटीट्युड आहे, आम्ही काही करू शकतो. या एटीट्यूडला धक्का देण्याचं काम, देशातली संसदीय लोकशाही पद्धत एकमेकांना सत्ता संतुलित करण्याचं काम हे तत्व परत एकदा प्रस्थापित झाल आहे."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com