Ranjeet Kasle : मोठी बातमी, बीड प्रकरणात गंभीर आरोप करणारे रणजीत कासले पोलिसांना शरण येणार

Ranjeet Kasle : मोठी बातमी, बीड प्रकरणात गंभीर आरोप करणारे रणजीत कासले पोलिसांना शरण येणार

निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले आज पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले आज पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती मिळत आहे. बीड प्रकरणात रणजीत कासले याने गंभीर आरोप केले आहेत. रणजीत कासले पोलिसांना शरण येणार असल्याचे त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत सांगितले.

यातच काल बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी निलंबित करण्यात आलेले रणजित कासले काल पुणे विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कासले यांनी अनेक गोष्टींवर तेव्हा भाष्य केले. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरपासून ते विधानसभा निवडणुकीकरता मतदान केंद्रावरील त्याच्या कामाशिवयी त्याने सर्व खुलासा केला. माझ्याकडे पुरावे असून मी सर्व गोष्टी उघड करण्यासाठी आलो असल्याचे रणजित कासले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com