CSMT bus stand
CSMT bus stand

CSMT bus stand : सीएसएमटी बसस्टॉपजवळ संशयित बॅग; बॉम्बशोधकांनी तपासानंतर दिलासा

सीएसएमटी बसस्टॉपजवळ आज सकाळी एक लाल रंगाची संशयास्पद बॅग आढळल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • सीएसएमटी बसस्टॉपजवळ संशयित बॅग;

  • बस डेपो रिकामा, बॉम्बशोधकांनी तपासानंतर दिलासा

  • स्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

सीएसएमटी बसस्टॉपजवळ आज सकाळी एक लाल रंगाची संशयास्पद बॅग आढळल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली. नेहमीच प्रवाशांची वर्दळ असलेल्या भागात ही बॅग दिसताच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. काही मिनिटांतच मुंबई पोलीस, आरपीएफ आणि जीआरपीची पथके घटनास्थळी दाखल झाली. कोणताही धोका टाळण्यासाठी बस डेपो तात्काळ रिकामा करण्यात आला आणि परिसर सील करण्यात आला.

दिल्लीतील झालेल्या मोठ्या स्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा अलर्टवर असल्याने या घटनेला अधिक गांभीर्याने घेतले गेले. संशयित बॅगेच्या तपासणीसाठी बॉम्बशोधक पथक घटनास्थळी बोलावण्यात आले. संपूर्ण परिसरात काँबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले, तर प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

बॉम्बशोधक पथकाने बॅग सावधपणे उघडून तपासणी केली असता त्यात कपडे आणि काही वैयक्तिक वस्तू आढळल्या. कोणतीही घातक सामग्री न सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. तरीही ही बॅग नेमकी कोणाची, ती तिथे का ठेवली गेली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी बॅगेचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.

घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे. सुरक्षा यंत्रणा अद्यापही हाय अलर्टवर असून तपास सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com