raigad
raigad

Raigad : रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

रायगडच्या मुरूड तालुक्यातील कोरलई इथे समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Raigad) रायगडच्या मुरूड तालुक्यातील कोरलई इथे समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आल्याची माहिती मिळत आहे. ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

पोलिसांनी रात्रीच कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं असल्याची माहिती मिळत असून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या बोटीतून अनेकजण उतरले असल्याची माहिती मिळत आहे.

रायगड पोलीस, तटरक्षक दल, बाँब शोधक सर्व यंत्रणा, सीमा शुल्क विभाग, स्थानिक गुन्हे शाखा, नौदल, घटनास्थळी पोहोचल्याची माहिती मिळत असून अनेक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता सकाळी सर्व यंत्रणांच्या मदतीने ऑपरेशन राबवण्यात येणार असून ही बोट खोल समुद्रात असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com