Ranjit Savarkar
Ranjit SavarkarTeam Lokshahi

सावरकरांच्या इंग्रजी पत्राचा मुळात राहुल गांधींनी केलेला अनुवादच चुकीचा होता- रणजीत सावरकर

सावरकरकरांनी ब्रिटिशांकडे पाठवलेलं पत्र हा इतर कैद्यांना सोडण्यात यावे, यासाठीचा होता.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा दाखल झाली आहे. मात्र, या यात्रे दरम्यान, राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यावरच आता सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी स्पष्टीकरण दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिलेले पत्र वाचून, खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्यावर केलेले आरोप चुकीचे होते. कारण सावरकरांच्या इंग्रजी पत्राचा मुळात त्यांनी केलेला अनुवादच चुकीचा होता, असे रणजित सावरकर यावेळी बोलताना म्हणाले.

Ranjit Savarkar
भारत जोडो यात्रेचे ध्येय हे 'मन की बात' करण्यासाठी नाही, राहुल गांधींचा भाजपवर घणाघात

काय म्हणाले रणजित सावरकर?

राहुल गांधींच्या विधानावर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, "स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे केलेला अर्ज हा इतर कैद्यांच्या सुटकेसाठी होता. त्यांनी त्या अर्जात ही माझी माफी आहे, असं कुठेही म्हटलेलं नाही. मी नोकर व्हायला तयार आहे, हे राहुल गांधींनी उच्चारलेले वाक्य सावरकरांच्या मूळ पत्रात नाही. राहुल गांधींनी पत्राचा चुकीचा अनुवाद केला." असे ते म्हणाले.

पुढे बोलताना रणजीत सावरकर म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आरोप होतात त्याचे स्पष्टीकरण व्हावे. अंदमानमध्ये नियम होता की कुठलाही कैदी आला तर त्याला सहा महिने बॅरकमध्ये ठेवले जाते. मात्र 13 वर्षे सावरकर आणि त्यांच्या साथीदारांना बॅरकमध्ये ठेवले गेले. ब्रिटिश सावरकरांना क्रांतिकारक मानत नव्हते. ते म्हणायचे तुम्ही सामान्य कैदी आहेत. सर्व कष्टाची काम सावरकर करत होते. 1914 मध्ये त्यांनी दुसरा अर्ज केला की आता महायुद्ध आहे त्यामुळे सर्वाना सोडा. पण तुम्हाला माझ्याबद्दल शंका वाटत असेल तर तुम्ही मला सोडू नका. असे ही रणजित सावरकर यावेळी बोलताना म्हणाले.

पंडीत नेहरू यांना हनीट्रॅप मध्ये अडकवून देशाची फाळणी करण्यात आली. माऊंटबॅटन यांच्या पत्नीसोबतचे नेहरूंचे पत्रव्यवहार समोर आणावेत असे, रणजीत सावरकर म्हणाले. एका बाईसाठी त्यांनी देशाची फाळणी घडवून आणली, असा गंभीर आरोप यावेळी देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्यावर रणजित सावरकर यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com