शेअर बाजारात ऐतिहासिक बदल; सकाळच्या सत्रातील शेअर विक्रीनंतर संध्याकाळी खात्यात रक्कम होणार जमा

शेअर बाजारात ऐतिहासिक बदल; सकाळच्या सत्रातील शेअर विक्रीनंतर संध्याकाळी खात्यात रक्कम होणार जमा

शेअर बाजारात ऐतिहासिक बदल करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

शेअर बाजारात ऐतिहासिक बदल करण्यात आला आहे. सकाळच्या सत्रात शेअरची विक्री केल्यास संध्याकाळी तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल. 27 जानेवारी 2023 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मोठा बदल होत आहे. आता भारतीय बाजारात सर्वच स्टॉक, टी+2 ऐवजी टी+1 सेटलमेंट (T+1 Settlement) मध्ये बदलतील.

या नियमामुळे बाजारात गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. एकाच दिवसात खात्यात रक्कम येत असल्याने व्यवहारांनाही गती मिळेल. तर परदेशातील गुंतवणूकदारही आता जादा रक्कम गुंतवू शकतील. ट्रेड पूर्ण झाल्यावर गुंतवणूकदारांना सेटलमेंटची रक्कम खात्यात जमा होण्यासाठी वाट पहावी लागणार नाही. ट्रेडची रक्कम अवघ्या 24 तासात खात्यात जमा होणार आहे.

शेअर बाजारात खरेदीदार आणि विक्री करणारे यांच्यात ट्रेड पूर्ण झाला की रक्कम ही लवकर मिळेल. जुन्या नियमामुळे सेटलमेंटसाठी दोन दिवसांची वाट पहावी लागत होती. T+1 सुविधेमुळे गुंतवणूकदारांना निधी आणि शेअरमध्ये तेजीने ट्रेड सेटलमेंट करता येतील . त्यांच्या खात्यात आता पूर्वीपेक्षा एक दिवस आधी रक्कम जमा होईल. 27 जानेवारी 2023 रोजी आता हा नियम बदलेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com