TMKOC
TMKOCTMKOC

TMKOC: 8 वर्षांनंतर 'तारक मेहता'मध्ये परतणार जुना कलाकार?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय शोमध्ये एक जुना कलाकार परत येणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही वर्षांत या मालिकेतून अनेक कलाकारांनी सुट्टी घेतली असली.
Published by :
Riddhi Vanne
Published on

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय शोमध्ये एक जुना कलाकार परत येणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही वर्षांत या मालिकेतून अनेक कलाकारांनी सुट्टी घेतली असली, तरी आता एक जुना चेहरा पुन्हा शोमध्ये दिसणार आहे.

2008 मध्ये सुरु झालेल्या या मालिकेतील एक अत्यंत लोकप्रिय पात्र म्हणजे टप्पू, ज्याची भूमिका भव्य गांधीने साकारली होती. भव्य 2008 ते 2017 पर्यंत शोचा भाग होता, आणि त्याच्या टप्पूच्या भूमिकेने त्याला देशभरात प्रसिद्धी मिळवून दिली. भव्य शो सोडल्यानंतर तो पुन्हा ‘तारक मेहता’मध्ये परत येणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

भव्य गांधीने सांगितले, "माझ्या करिअरमध्ये 'तारक मेहता'चं मोठं योगदान आहे, आणि जर संधी मिळाली तर मी नक्कीच परत येईल." भव्यने एका मुलाखतीत शो सोडण्याबाबत खुलासा करत सांगितले, "मी तेव्हा लहान होतो आणि शोसाठी किती पैसे मिळतात हे मला माहीत नव्हते. माझे आई-बाबा सर्व आर्थिक व्यवहार सांभाळत होते. शो सोडल्यावर मी गुजराती चित्रपटांकडे वळलो आणि तिथेही चांगली ओळख निर्माण केली." भव्यच्या परत येण्याची शक्यता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी ठरू शकते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com