पतीच्या आत्महत्येस जबाबदार आरोपींच्या विरोधात कारवाई करा, अन्यथा आम्हाला विष द्या
अमजद खान।कल्याण: नवऱ्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या आरोपींच्या विरोधात ठोस कारवाई करण्यात यावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली पाहिजे. कारवाई होत नसल्यास आम्हाला विष द्या. मी आणि माझा मुलगा पतीपाठोपाठ आम्ही आत्महत्या करु असा इशारा प्रल्हाद पाटील यांच्या पत्नी स्वप्ना पाटील यांनी दिली आहे. तीन दिवसापूर्वी व्यावसायात होत असलेल्या त्रसा कंटाळून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी व्हीडीओ आणि सुसाईड नोट तयार केली होती. डोंबिवली जीआारपीने पंधरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवलीतील संदप गावात राहणा:या प्रल्हाद पाटील या व्यक्तीने दातिवली आणि निळजे स्टेशन दरम्यान रेल्वे खाली उडी मारुन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने व्हीडीओ तयार करुन सुसाईड नोट लिहीली होती. या व्हीडीओत त्याने त्याला होत असलेल्या छळाची व्यथा मांडली. यासाठी जबाबदार पंधरा जणांच्या विरोधात ठाणो जीआरपीने गुन्हा दाखल केला होता. यात संदीप माळीसह पंधरा जणांच्या समावेश आहे. ठाणे जीआरपीने गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. यातील काहीआरोपींना अटक पूर्व जमीन मिळाला आाहे. मात्र प्रल्हाद पाटील यांच्या पत्नी स्वप्ना यांनी न्यायासाठी आवाहन केले आहे.