आज तलाठी भरती परीक्षा मात्र परीक्षेवर आंदोलनाचं सावट...

आज तलाठी भरती परीक्षा मात्र परीक्षेवर आंदोलनाचं सावट...

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
Published by  :
Siddhi Naringrekar

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमुळे राज्यभरातील वातावरण देखील चांगलेच तापले आहे. यातच आज जालन्यातील घटनेनंतर मराठवाड्यातील सर्व बस सेवा ठप्प झाल्या आहेत. आज तलाठी परीक्षा आहे.

मात्र यावेळीही मराठा आंदोलनामुळे परीक्षार्थींच्या वाटेत अनेक अडचणी आहेत. मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस सरकारने बंद केल्या आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल ट्विट केलं होत की, राज्यात उद्या तलाठी परीक्षा आहे, ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून मागणी केली आहे. मराठा आरक्षणाची मागणी करणार्‍या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ उद्या बंद पुकारण्यात आला आहे.

उमेदवारांना परीक्षेसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागणार आहे. मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस सरकारने बंद केल्या आहे त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भार वाढून वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षेच्या परीक्षार्थींना फटका बसू नये ,म्हणून ही परीक्षा तातडीने पुढे ढकलण्याची घोषणा सरकारने करावी. असे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com