रत्नागिरीत अंजनारी पुलावरून टँकर पलटी; चालक जागीच ठार
Team Lokshahi

रत्नागिरीत अंजनारी पुलावरून टँकर पलटी; चालक जागीच ठार

मुंबई - गोवा महामार्गावर लांजा येथील अंजनारी पुलावरून एलपीजी गॅसचा टँकर नदीत पलटी झाला आहे.

निसार शेख, रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर लांजा येथील अंजनारी पुलावरून एलपीजी गॅसचा टँकर नदीत पलटी झाला आहे. यामध्ये चालक जागीच मृत्यू पावला आहे. तसेच नदीच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकरची गॅस गळती सुरू आहे.

मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार 28 हजार kv टनाचा जम्बो टँकर लांजा येथील अंजनारी पुलावरून एल पी जी गॅसचा टँकर नदीत पलटी झाला आहे. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी धाव घेतली. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. हायवे क्रेनच्या साह्याने चालकाचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, टँकरमधील गॅस गळती सुरू असल्याने परिसरातील नागरिकामध्ये भितीचे वातावरण आहे. सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Lokshahi
www.lokshahi.com