ताज्या बातम्या
Gautam Gambhir : गौतम गंभीरला ISIS कडून जीवे मारण्याची धमकी
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला 'आयएसआयएस काश्मीर' कडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
एका अज्ञात ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांचे सायबर गुन्हे पथक हे धमकीचे ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे.