Infosys Company : इन्फोसिसच्या मेलमधून नारायणमूर्तींच्या विचारांना आव्हान ; वर्क-लाइफ बॅलन्सचा आग्रह
2023 मध्ये इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमात इन्फोसिस कंपनीचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 70 तास काम करावे असे वक्तव्य केलेले असतानाच दुसरीकडे त्यांच्याच इन्फोसिसच्या बंगळुरू येथील मुख्यालयाकडून कर्मचाऱ्यांना एक अधिकृत मेल पाठवला आहे त्यात कामगारांनी केवळ आपल्या दिलेल्या वेळेतच काम करावे. काम आणि आपल्या दैनंदिन आयुष्याचा समतोल राखला गेला पाहिजे असे त्या मेल मध्ये उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे नारायणमूर्ती यांचे विचार त्यांच्या कंपनीचे धोरण यात कमालीचा विरोधाभास दिसत आहे.
एकीकडे इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायणमूर्ती यांचा कर्मचाऱ्यांसाठी 70 तासांचा कार्यालयीन आठवडा असावा असा विचार असताना मात्र त्यांच्या कंपनीचा मात्र वेगळा, विचार वेगळे धोरण पाहायला मिळत आहे. याबाबत इन्फोसिसच्या बंगळुरू येथील मुख्यालयाकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना एक ऑफिशिअल मेल केला गेला आहे. त्यात त्यांनी वर्क लाईफ बॅलेन्स बद्दलच्या धोरणांचा अवलंब करण्यास सांगितले आहे. त्यांच्या मेल मधील काही महत्वाचे मुद्दे
- ठरवून दिलेल्या वेळेमध्येच काम करा. ओव्हरटाईम नको, वर्क फ्रॉम होम करणाऱ्याच्या कामाच्या तासावरही लक्ष ठेवले जाणार असून दिलेल्या तासांमध्येच काम करा.
- जास्त काम केल्यास कंपनीतर्फे आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात मेल पाठवला जातो.
- रोज केवळ 9 तास 15 मिनिटे कर्मचाऱ्यांनी काम करणे अपेक्षित आहे. वर्क वर्क फ्रॉम होम करणारे सुद्धा इतकेच तास काम करतील आणि यासाठी HR नजर ठेवणार आहे.
- कंपनी कर्मचाऱ्यांची काळजी घेत वर्क वर्क लाईफ बॅलेन्स करण्याबाबत सूचना करत आहेत. कामाच्या वेळेस मध्ये मध्ये ब्रेक घेणे, बरे वाटत नसल्यास इतरांची मदत घेणे किंवा आराम करणे. सुट्टीच्या दिवशी काम न करणे अश्या गोष्टींबाबत कंपनी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करत आहे. जेणेकरून उत्पादनक्षमतेमध्ये वाढ होईल.
नारायण मूर्तींच्या इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क लाइफ बॅलन्स राखण्याचे निर्देश दिले आहेत. 9.15 तासांपेक्षा जास्त काम करणाऱ्यांना ईमेलद्वारे आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. इन्फोसिसचे ससहसंस्थापक नारायणमूर्ती यांचे धोरण आणि प्रत्यक्षात त्यांच्या कंपनीचे धोरण यात मोठी तफावत असून इन्फोसिस कंपनीनें नारायण मूर्तींच्या विचारांच्या विरोधात धोरण स्वीकारलेले दिसत आहे. मात्र यात कर्मचाऱ्यांचा फायदा असून इन्फोसिसचा हा निर्णय इतर आयटी कंपन्यांसाठीही दिशादर्शक ठरू शकतो यात शंका नाही.