ताज्या बातम्या
BMC Election Result 2026 : एकट्याने लढून ‘तेजस्वी’ घोसाळकरांनी इतिहास घडवला, विजयाचं श्रेय कुणाला?
BMC Election Results 2026 : मुंबई महापालिका निवडणूक २०२६ मध्ये भाजपचे तेजस्वी घोसाळकर यांनी दणदणीत यश मिळवले आहे.
मुंबई महापालिका निवडणूक २०२६ मध्ये भाजपचे तेजस्वी घोसाळकर यांनी दणदणीत यश मिळवले आहे. भाजपकडून विजयी ठरणाऱ्या सुरुवातीच्या उमेदवारांपैकी ते एक असून निकालानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.
या विजयाचे श्रेय त्यांनी पक्षातील नेतृत्व, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिले. दिवस-रात्र काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांमुळेच हा विजय शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
“आमचा भर कायम विकासावर होता आणि जनतेनेही त्यालाच साथ दिली,” असे घोसाळकर यांनी स्पष्ट केले. राजकारणात कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा असतो, असे सांगत त्यांनी कुटुंबीयांच्या आशीर्वादाचे महत्त्व अधोरेखित केले. अनेक शुभेच्छा मिळाल्या असल्या तरी घरच्यांचा विश्वासच आपल्यासाठी सर्वात मोठी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
