Telangana Chemical Factory Blast : तेलंगणा फार्मा कंपनीतील स्फोटात 36 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

तेलंगणातील रासायनिक कारखान्यात झालेल्या स्फोटात मंगळवारी मृतांचा आकडा 36 वर पोहोचला आहे.
Published by :
Rashmi Mane

तेलंगणातील रासायनिक कारखान्यात झालेल्या स्फोटात मंगळवारी मृतांचा आकडा 36 वर पोहोचला आहे. बचाव कार्यादरम्यान आणखी मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केली. सोमवारी रात्रीपर्यंत 12 जणांचा मृतांचा आकडा मंगळवारी सकाळी 34 वर पोहोचला. अनेक अहवालांनी वेगवेगळे आकडे दिल्यानंतर आता तो ३६ वर पोहोचला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सिगाची इंडस्ट्रीज स्फोट घटनेबद्दल सांगितले की, अधिकृत अहवालांनुसार आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकारी बेपत्ता लोकांचा ठावठिकाणा पडताळत आहेत. "ढिगाऱ्याखाली अनेक मृतदेह सापडले आहेत. बचाव कार्याचा शेवटचा टप्पा अजूनही सुरू आहे," असे जिल्हा पोलीस अधीक्षक परितोष पंकज यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. सोमवारी पशामिलाराम येथील सिगाची केमिकल इंडस्ट्रीमध्ये संशयास्पद रिअॅक्टर स्फोटामुळे स्फोट आणि आग लागली. पत्रकारांशी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री दामोदर राजनरसिंहा म्हणाले की, घटनेच्या वेळी कारखान्यात सुमारे ९० कर्मचारी होते.

हेही वाचा

Telangana Chemical Factory Blast : तेलंगणा फार्मा कंपनीतील स्फोटात 36 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता
Pandharpur Wari 2025 : विठ्ठलाचं VIP दर्शन बंद; पदस्पर्श दर्शनाचा कालावधी आला निम्म्यावर
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com