तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची या दिवशी होणार महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची या दिवशी होणार महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा

भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा नांदेडमध्ये होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा नांदेडमध्ये होणार आहे. ज्या पद्धतीनं काही गावांनी कर्नाटकात जाण्यासाठी ठराव मंजूर केले. त्याच पद्धतीनं नांदेडच्या तेलंगाणा सीमा भागातल्या काही गावांनीही ठराव केले होते. त्यांनी तेलंगाणात जाण्याची तयारी दर्शवली होती

शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे 15 जानेवारी रोजी होणारी सभा रद्द झाली होती. त्यानंतर आता 5 फेब्रुवारीला सभा होणार आहे. नांदेडमधील नवीन मोंढा मैदानात सभा पार पडणार आहे. पक्ष आता राष्ट्रीय राजकारणात आला आहे. त्याच पक्ष वाढीसाठी आणि पक्ष बांधणीसाठी केसीआर यांनी महाराष्ट्रात पहिल्या महासभेचं आयोजन केले आहे.

पक्षाच्या अंतर्गत माहितीनुसार, तेलुगू भाषिक लोकसंख्या इतर राज्यांमधील लोकसभेच्या जवळपास 30 जागांच्या निकालांवर परिणाम करू शकते. त्यात कर्नाटकातील 40 विधानसभा आणि 14 लोकसभेच्या जागा, महाराष्ट्रातील 22 विधानसभा आणि 8 लोकसभेच्या जागा, छत्तीसगडमधील 12 विधानसभा आणि 3 लोकसभेच्या जागा, 18 लोकसभा जागांवर तेलगू भाषिक लोक प्रभाव दाखवू शकतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com