Actor Kota Srinivasa Rao Death: दिग्गज अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचं निधन
Actor Kota Srinivasa Rao Death: दिग्गज अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचं निधन, दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोकसागरActor Kota Srinivasa Rao Death: दिग्गज अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचं निधन, दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोकसागर

Actor Kota Srinivasa Rao Death: दिग्गज अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचं निधन, दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोकसागर

कोटा श्रीनिवास राव निधन: दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोक, 750 हून अधिक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय.
Published by :
Team Lokshahi
Published on

Actor Kota Srinivasa Rao Passes Away : चार दशकांहून अधिककाळ आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिग्गज तेलुगू अभिनेते आणि माजी आमदार कोटा श्रीनिवास राव यांचं वयाच्या 83 व्या वर्षी निधन झालं. नुकतेच त्यांनी 10 जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा केला होता, आणि त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या जाण्याने संपूर्ण दक्षिणात्य चित्रपटसृष्टी शोकमग्न झाली आहे. श्रीनिवास राव हे त्यांच्या अष्टपैलू अभिनयासाठी ओळखले जात. विशेषतः त्यांच्या खलनायकी भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. इतक्या परिणामकारक अभिनयामुळे अनेकांना खऱ्या आयुष्यातही त्यांच्याबद्दल चीड यायची. मात्र हीच चीडच त्यांच्यासाठी अभिनयातील सर्वोच्च पोचपावती मानली जात होती. ‘राव’ यांची एक वेगळीच अभिनयशैली होती. संयत, प्रभावी आणि सहजस्फूर्त अभिनयामुळे त्यांनी प्रत्येक भूमिका जिवंत केली.

1942 मध्ये आंध्र प्रदेशातील कंकीपाडू येथे जन्मलेले कोटा श्रीनिवास राव यांनी 1978 साली ‘प्राणम् खारीदू’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. 750 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या. तेलुगूसह त्यांनी तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्येही आपली छाप सोडली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आंध्र प्रदेश सरकारचा ‘नंदी पुरस्कार’ त्यांनी नऊ वेळा पटकावला. 2013 मध्ये अभिनेता रामचरणच्या 'नायक' या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. कोटा श्रीनिवास राव यांच्या निधनाने केवळ तेलुगू चित्रपटसृष्टीच नाही, तर संपूर्ण भारतीय कलाजगताने एक अत्यंत प्रभावशाली कलाकार गमावला आहे. त्यांच्या जाण्याने एक अभिनययुगच अस्तंगत झालं आहे.

हेही वाचा...

Actor Kota Srinivasa Rao Death: दिग्गज अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचं निधन
Abdu Rozik : अब्दू रोजिकच्या अटकेमुळे चाहत्यांमध्ये नाराजी, दुबई पोलिसांनी चोरीच्या आरोपावरून केली कारवाई
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com