News Anchor Death : भयंकर! 'या' न्यूज अँकरनं गळफास घेत संपवलं जीवन; राहत्या घरी संशयास्पद अवस्थेत आढळून आला मृतदेह

News Anchor Death : भयंकर! 'या' न्यूज अँकरनं गळफास घेत संपवलं जीवन; राहत्या घरी संशयास्पद अवस्थेत आढळून आला मृतदेह

हैदराबादमध्ये कार्यरत असलेल्या आघाडीच्या तेलुगू न्यूज चॅनलच्या महिला अँकरचा मृतदेह तिच्या राहत्या घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला.
Published by :
Team Lokshahi
Published on

हैदराबादमध्ये कार्यरत असलेल्या आघाडीच्या तेलुगू न्यूज चॅनलच्या महिला अँकरचा मृतदेह तिच्या राहत्या घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, स्वेच्छा वोटारकर (वय 40) या पत्रकाराने शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा संशय आहे.

हादरवून टाकणाऱ्या या घटनेमुळे प्रसारमाध्यमांमध्ये शोककळा पसरली आहे. स्वेच्छाच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, एका व्यक्तीच्या मानसिक त्रासामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यावरून गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर भारत राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत स्वेच्छाच्या निर्भय पत्रकारितेचे आणि तिच्या लेखनशैलीचे कौतुक केले.

रामाराव यांनी आपल्या संदेशात नागरिकांना आत्महत्येचा विचार न करता व्यावसायिक मदत घेण्याचं आवाहन केलं आहे. “जीवन हे जगण्यासाठी आहे. कुणीही एकटे नाही. मदत मागण्यात संकोच करू नका. आत्महत्या ही कोणत्याही समस्येचं उत्तर नाही,” असं त्यांनी नमूद केलं.

स्वेच्छा वोटारकर यांच्या मृत्यू मागील नेमका कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. माध्यम क्षेत्रात त्यांचे योगदान लक्षणीय होते, अशी प्रतिक्रिया अनेक सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा

News Anchor Death : भयंकर! 'या' न्यूज अँकरनं गळफास घेत संपवलं जीवन; राहत्या घरी संशयास्पद अवस्थेत आढळून आला मृतदेह
Shubhanshu Shukla Axiom 4 : भारतीय शास्त्रज्ञांच्या 7 युनिक संशोधनांवर मोहिमेदरम्यान प्रयोग करणार; शुभांशु शुक्लानं सांगितला पंतप्रधानांना प्लॅन
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com