Beed : बीडमध्ये दहा वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार

Beed : बीडमध्ये दहा वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार

बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील चौसाळा येथे दहा वर्षीय मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Published on

विकास माने, बीड

बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील चौसाळा येथे दहा वर्षीय मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चौसाळा येथे एक चायनीज कॉर्नर चालवणारा आणि त्याच्या दोन साथीदाराने मुलीला शंभर रुपये आणि चिकन खायला देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर मुलीच्या जुन्या घरी नेवून तिच्यावर नराधमांनी अत्याचार केला.

पिडीत मुलीला त्रास सुरु झाल्यानंतर तिच्या आईला हा प्रकार लक्षात आला. तिने विश्वासात घेत मुलीला विचारल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. संबंधित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून हे तीनही आरोपी फरार आहेत. मात्र या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com