भीषण दुर्घटना! खासगी बसला आग लागून 10 ते 12 जणांचा होरपळून मृत्यू
Admin

भीषण दुर्घटना! खासगी बसला आग लागून 10 ते 12 जणांचा होरपळून मृत्यू

नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका येथे एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत दहा ते बारा प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे.

 नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका येथे एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत दहा ते बारा प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. तब्बल 10 ते 12 प्रवाशी या भीषण दुर्घटनेत जिवंत जळाले आहेत. अपघात झालेल्या ठिकाणी आता बचावकार्य करण्यासाठी पोलीस, अग्निशमन यंत्रणा दाखल झाल्या आहेत.

बसला आग लागल्याने अनेकजण गंभीररित्या भाजले गेल्याने, त्यांच्यावर आता रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून, मदतकार्य सुरू आहे. यवतमाळच्या पुसदहून खासही बस मुंबईच्या दिशेने येत होती. त्यावेळी नाशिकजवळ या बसचा अपघात झाला. ट्रक आणि बस यांच्या धडक होऊन हा भीषण अपघात घडला. या अपघातानंतर बसमध्ये आग लागली.

खासगी बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते. नाशिकच्या मिरची हॉटेलजवळ या बसचा अपघात घडला. मिरची हॉटेल येथील परिसर हा अपघात प्रवण क्षेत्र असल्याचंही सांगितलं जातं. त्यातच यवतमाळहून मुंबईला जाणाऱ्या या बसच्या भीषण अपघातानं एकच खळबळ उडाली आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जातेय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com