दिल्लीत भीषण अपघात! डिव्हायडरवर झोपलेल्या मजुरांना ट्रकने चिरडले; ४ जणांचा मृत्यू

दिल्लीत भीषण अपघात! डिव्हायडरवर झोपलेल्या मजुरांना ट्रकने चिरडले; ४ जणांचा मृत्यू

अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह फरार

नवी दिल्ली : दिल्लीत मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. सीमापुरी भागात दुभाजकावर झोपलेल्या मजुरांना ट्रकने चिरडले. यात चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. डीटीसी डेपोजवळ रात्री उशिरा १.५१ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर आरोपी ट्रकचालक ट्रकसह फरार झाला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची अनेक पथके छापेमारी करत आहेत.

सीमापुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा रस्त्यावर शांतता असताना काही मजुर दुभाजकावर झोपले होते. रात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास डीटीसी डेपोच्या रेडलाईटजवळ मद्यधुंद ट्रकचालकाने भरधाव ट्रक चालवत असताना तो अनियंत्रित झाला. व दुभाजकावर झोपलेल्या लोकांना चिरडले.

हे पाहून आजूबाजूचे लोक धावत आले. यावळी दोघांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले होते. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु, उपचाराआधीच दोघांचा मृत्यू झाला होता. तर इतर दोघांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाच्या आधारे पोलीस ट्रक चालकाची पडताळणी करत आहेत. घटनास्थळाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Lokshahi
www.lokshahi.com