Accident
ताज्या बातम्या
Accident : जयपूरमध्ये भीषण अपघात; 16 जण जखमी, एकाचा जागीच मृत्यू
जयपूरमध्ये भीषण अपघात झाला.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Accident) जयपूरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजता मानसरोवर परिसरातील पत्रकार कॉलनीजवळ हा अपघात घडला.
एक पांढऱ्या रंगाची कार दुसऱ्या एका कारसोबत शर्यत लावत अत्यंत वेगाने येत होती. आधी ही कार दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर तिचे नियंत्रण सुटले.
अनियंत्रित झालेली ही कार रस्त्याकडेला जेवण करणाऱ्या आणि उभे असलेल्या 16 जणांना धडकली. अशी माहिती मिळत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Summary
जयपूरमध्ये भीषण अपघात
रेसिंगच्या नादात 16 जणांना चिरडलं
एकाचा जागीच मृत्यू
