Tahawwur Rana: 26/11हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा
मोठी बातमी समोर आली आहे, पाकिस्तान वंशांचा कॅनडातील व्यापारी तहव्वुर राणा जो 26/11 मुंबई दहशतवादी या हल्ल्यातील मास्टरमाईंड होता त्याला आता लवकरच भारताकडे सोपवण्यात येणार आहे. त्याला भारतात आणण्यासाठी कायद्यासोबतच राजकीय संबंधांचा वापर करण्यात येत आहे.
ऑगस्ट 2024 मध्ये अमेरिकन न्यायालयाने प्रकरणात फैसला सुनावला होता. अमेरिकन कोर्टाने राणाची याचिका फेटाळल्यानंतर त्याला मोठा झटका बसला होता. भारत-अमेरिका या दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण संधी अंतर्गत त्याला भारताला सोपवण्यास न्यायालयाने मंजूरी दिली होती. दरम्यान राणाला लवकरच भारतात आणण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असून भारताचं हे मोठं यश मानण्यात येत आहे.
कोण आहे तहव्वूर राणा?
तहव्वूर राणावर पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेज इंटेलिजेंस आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तयब्बाचा सक्रिय सदस्य असल्याचा आरोप आहे. मुंबईमध्ये झालेल्या 26/11 या हल्ल्यातील दोषारोपपत्रात तहव्वुर राणा याचे नाव आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले होते. मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड डेव्हिड कोलमॅन हेडलीला तहव्वूर राणाने 26/11 या हल्ल्यात मदत केल्याचे तपासात समोर आले होते. हल्ल्यानंतर त्याला एका वर्षाच्या कालावधीत FBI ने शिकागो येथून अटक केलं होत.