ताज्या बातम्या
ठाकरे गटाचा 1 जुलैला विराट मोर्चा; नवा मार्ग ठरला, पण...
आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाकरे गट येत्या 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर भव्य मोर्चा काढणार आहे.
आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाकरे गट येत्या 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर भव्य मोर्चा काढणार आहे. 1 जुलैच्या मोर्चाची परवानगी मिळावी यासाठी ठाकरे गटानं पुन्हा एकदा पोलिसांना पत्र दिलेलं आहे. यावर उद्यापर्यंत मुंबई पोलीस निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
मेट्रो सिनेमा ते टाईम्स ऑफ इंडिया इमारत या मार्गावरुन मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात यावी, अशा आशयाचं पत्र ठाकरे गटानं पोलिसांना दिलं होतं. मात्र यामोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यानंतर पोलीस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या चर्चेनंतर मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला आहे. बदललेला मार्ग मेट्रो सिनेमा ते थेट महानगर पालिकेच्या इमारतीपर्यंत असेल, अशी माहिती मिळत आहे.