बांगर यांनी मिशी काढून यावं, आम्ही खांद्यावर बसवून मिरवणूक काढू; ठाकरे गटानं दिलं आव्हान

बांगर यांनी मिशी काढून यावं, आम्ही खांद्यावर बसवून मिरवणूक काढू; ठाकरे गटानं दिलं आव्हान

हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात.
Published by :
Siddhi Naringrekar

हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. आता तर त्यांनी कळमनुरी बाजार समिती निवडणुकीमध्ये 17 पैकी 17 जागा निवडून नाही आणल्या तर मिशी ठेवणार नाही, असं आव्हान दिल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे यांनी बांगर यांना आव्हान दिलं आहे. त्यांनी आव्हान दिलं की, "तुम्ही मिशी काढून या, तुम्हाला खांद्यावर घेत मिरवणूक काढू. बांगर यांनी विधानसभेत निवडून येऊन दाखवावं आम्ही राजकारण सोडून देतो. असे भिसे म्हणाले.

 बांगर यांनी मिशी काढून यावं, आम्ही खांद्यावर बसवून मिरवणूक काढू; ठाकरे गटानं दिलं आव्हान
संतोष बांगरांना चॅलेंज पडणार महागात? प्रिय लाडक्या दादुड्या मुछ कधी काढतोय, अयोध्या पौळ यांचा सवाल
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com