ठाकरे गटाची लोकसभेच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर; संजय राऊत म्हणाले...

ठाकरे गटाची लोकसभेच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर; संजय राऊत म्हणाले...

ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटाची लोकसभेच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले की, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिलेल्या 17 लोकसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा आज सकाळी शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे. एकूण 22 जागा शिवसेना लढते आहे. उरलेली जी ५ नावे आहेत ती येत्या 2 दिवसांत जाहीर केली जातील. उमेदवार निश्चित झालेलं आहेत.

हातकणंगलेमध्ये लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीकडे पाठिंबा मागितलेला आहे. ती जागा शिवसेनेकडे आहे. त्यासंदर्भात आम्ही एकत्र बसून विचार करु. कोणताही तिढा नाही. शिवसेनेनं ज्याअर्थी या जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली आहे त्याअर्थी तिथे कोणताही तिढा असेल असं मला वाटत नाही. रामटेक आमची सिटींग जागा होती. ही जागा आम्ही सातत्याने लढतो आणि जिंकतो. त्या जागेवर काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला. त्याच्यावर आम्ही कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही. कारण चर्चेतून तो प्रश्न सुटला होता. त्याबदली आम्ही ईशान्य मुंबई जागा लढवू असे त्यांना सांगितले. स्वत: चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगलीत जाऊन त्यांनी सगळ्यात मोठी प्रचार सभा घेतली. पश्चिम महाराष्ट्रात आमच्याकडे जागा नाही.

शिवसेना हा मोठा पक्ष. कोल्हापूर ही आमची हक्काची जागा होती. 30वर्ष ती जागा आम्ही लढतो आहोत. यावेळेला ती सिटींग जागा होती. पण छत्रपती शाहू महाराज यांचे नाव पुढे आल्यावर आणि ते काँग्रेसच्या चिन्हावर लढत आहेत असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही त्याच्यामध्ये कोणताही वादविवाद न करता आम्ही ती जागा काँग्रेससाठी सोडली. कारण महाविकास आघाडीचा निर्णय होता. राजू शेट्टी यांच्याशी हातकणंगलेवर चर्चा सुरु आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात आमच्याकडे एकतरी जागा असावी आणि सगळ्यांनी मिळून त्या जागेवरती विजय मिळवावा अशी आमची भूमिका आहे. त्यानुसार सांगलीच्या जागेची आम्ही मागणी केली आणि मला असं वाटते तो विषय संपलेला आहे. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com