“त्यांनी महागाईचे ‘दिवे’ लावण्याशिवाय दुसरे काय केले?  ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल

“त्यांनी महागाईचे ‘दिवे’ लावण्याशिवाय दुसरे काय केले? ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल

देशात महागाई चांगलीच वाढत चालली आहे.

देशात महागाई चांगलीच वाढत चालली आहे. वाढत्या महागाईवरुन ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सामनातून म्हटले आहे की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या तरी आपल्या देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढच होत असतेजागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीनुसार कमी-जास्त होणे अपेक्षित आहे. मात्र मोदी सरकारच्या काळात हे ‘समीकरण’ही खुंटीला टांगून ठेवले गेले आहे. असे सामनातून म्हटले आहे.

‘मोदीनॉमिक्स’चे ढोल जगभर पिटणारा सत्ताधारी पक्ष आणि अंधभक्त यांचे या ‘जगात स्वस्ताई, भारतात महागाई’ या उफराट्या समीकरणावर काय म्हणणे आहे? महागाईचा असाही ‘चमत्कार’ फक्त मोदीच करू शकतात. महागाईवरुन काँगेसविरोधात ठणाणा करीत जे सत्तेत बसले त्यांनीही दरवाढीची ‘वात’ आणि महागाईचे ‘दिवे’ लावण्याशिवाय दुसरे काय केले? असे म्हणत सामनातून हल्लाबोल केला आहे.

‘जगात महागाई कमी झाली असली तरी भारतात मात्र ती वाढली आहे,’ अशी ही बातमी आहे. या बातमीनुसार जानेवारीमध्ये जागतिक बाजारात महागाई दर कमी झाला असला तरी भारतात मात्र तो वाढला आहे. आता सत्ताधाऱ्यांचे काय म्हणणे आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे म्हणत जोरदार टीका करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com