ठाकरे गटाची केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात याचिका; आज होणार सुनावणी
Admin

ठाकरे गटाची केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात याचिका; आज होणार सुनावणी

निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांना विजय झाला आहे.

निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांना विजय झाला आहे. धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धक्का देत धनुष्यबाण व शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे.

यानंतर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर ठाकरे गटाने विरोध दर्शवला आहे. जी याचिका ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आली त्यावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने सोमवारी सरन्यायाधीश धनचंद्र चंद्रचुड यांच्या खंडपीठासमोर केली. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी होणार आहे. यात काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com